Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»आरोग्य कार्यालयाची महापौरांकडून तपासणी
    आरोग्य

    आरोग्य कार्यालयाची महापौरांकडून तपासणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 16, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम देत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी सोमवार दि. 16 फेब्रुवारी पहाटे प्रभाग क्रमांक 5 मधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हजेरी पुस्तकाची तपासणी करत गैरहजर आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

    पहाटे सहा वाजता महापौरांनी थेट आरोग्य विभागाच्या कार्यालयात एन्ट्री केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. महापौरांनी हजेरी पुस्तकाची तपासणी केली. पटावर किती कर्मचारी आहेत आणि प्रत्यक्ष कामावर किती हजर आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना गैरहजर राहत असतील, त्यांची वेळीच नोंद घ्या. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असणे गरजेचे आहे. जर कर्मचारी बेशिस्त वागत असतील, तर त्यांना तात्काळ शिस्त लावा, अन्यथा मला कठोर भूमिका घ्यावी लागेल, अशा शब्दांत महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले.

    व्यापारी संकुलांमधील अस्वच्छतेवरून संताप

    प्रभाग 5 मधील विविध व्यापारी संकुलांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्यक्ष परिसरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली. मार्केटची स्वच्छता नियमित झालीच पाहिजे. व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गटनेते विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, मंगला चौधरी, महेश पाटील यांच्यासह महापालिकेचे इतर पदाधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

    Attendance Book Health Department jalgaon Mahesh Patil Mangala Chaudhary Mayor Deepmala Kale Municipal Corporation Nitin Laddha Vishnu Bhangale
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 वरून 25 दिवसांवर

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.