Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»लक्ष द्या.. माथेरान पर्यटकांसाठी बंद !
    महाराष्ट्र

    लक्ष द्या.. माथेरान पर्यटकांसाठी बंद !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रात पर्यटनासाठी माथेरान अत्यंत प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असलेले माथेरान हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. मुंबई कर्जत रेल्वे मार्गावर असलेल्या नेरळपासून ९ किलोमीटर असणाऱ्या माथेरानमध्ये बंदची हाक पुकारले आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पर्यटन बचाव समितीने बंद पुकारला आहे. पर्यटकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात संपूर्ण माथेरान बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

     

    काय आहे कारण ?

    माथेरानच्या दस्तुरीपासून बाजारपेठ अवघ्या अडीच किलोमीटरच्या अंतरावर पर्यटकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या विरोधात मंगळवारी माथेरानमध्ये कडेकोट बंद पुकारला. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने पर्यटकांची कोंडी झाली. पर्यटकांची फसवणूक होत असल्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम होत आहे. ही फसवणूक बंद होण्यासाठी पर्यटन बचाव संघर्ष समितीने बेमुदत बंदची हाक पुकारली आहे. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बंद पुकारला आहे. बंदला हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे.स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, असा आरोप देखील संघटनेने केला आहे.

    माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना गावात आणण्याऐवजी बळजबरीने पॉइंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनी ट्रेन बंद आहे. ई-रिक्षाचा वापर फक्त स्थानिकांसाठी आहे,अशी खोटी माहिती दिली जाते. या ठिकाणी असणारे घोडेस्वार स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करतात. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याचा आरोप पर्यटन बचाव समितीचा आहे.

    दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले, कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे. या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत माथेरान हे बंदच राहणार आहे. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्या आणि माथेरान पुन्हा एकदा पर्यटनसाठी खुला करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केले आहे.

    Matheran
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif