जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांमध्ये दुपारपर्यंत ४४.९७ टक्के मतदान

0

जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांमध्ये दुपारपर्यंत ४४.९७ टक्के मतदान

जळगाव प्रतिनिधी ।जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद निवडणुकांमध्ये आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ठिकठिकाणी ४५ ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान मतदानाची नोंद झाली असून एकूण ४४.९७ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र दिसत असून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे.

जामनेर येथे ४१. ३२ टक्के मतदान झाले असून भुसावळमध्ये ४०. ४१ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले आहे. यावलमध्ये मतदारांनी मोठी गर्दी करत थेट ५६. 25 टक्के मतदानाची नोंद केली. फैजपूरमध्ये ५५. १२टक्के, तर पाचोरामध्येही ४०. ३१टक्के मतदान झाले. वरणगाव ४९.६० टक्क्यांसह आघाडी घेतली असून अमळनेरचा मतदानाचा टक्का ४४. ५१ वर स्थिरावला आहे.

चाळीसगावमध्ये ४३. ९४टक्के, तर सावद्यात ४३. ४८ टक्के मतदान झाले. चोपड्यात ४५. १२ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले असून भडगावमध्ये ३३.३७ टक्के मतदान झाले. रावेरने ५०.९४ टक्क्यांची उल्लेखनीय नोंद करत जिल्ह्यातील अव्वल मतदान केंद्रांपैकी स्थान मिळवले. धरणगावमध्ये ५१.५३ टक्के, तर एरंडोलमध्ये तब्बल ५६.५१ टक्क्यांची नोंद झाली आहे.

पारोळ्यात ४८. ४९ टक्के, नशिराबादमध्ये ४५.६५ आणि मुक्ताईनगरमध्ये ४१.४८ टक्के मतदान झाले. शेंदुर्णीनेही उत्साह दाखवत ५१.५२ टक्क्यांची नोंद केली. दुपारनंतर मतदारांच्या सहभागात वाढ झाल्याने संध्याकाळपर्यंत मतदानाचा आकडा आणखी चढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे सुरळीत आणि शांततेत सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.