Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»केमिकल फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट : आगीचा भडका
    अपघात

    केमिकल फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट : आगीचा भडका

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 16, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राजस्थानमधील भिवाडी येथील एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची ङटना समोर आली आहे. केमिकल फॅक्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाल्यामुळे आग लागली होती. ही आग पसरत संपूर्ण फॅक्ट्रीमध्ये लागली. यामध्ये ८ कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे समजतेय. तर काहीजण जखमी आहेत. फॅक्ट्रीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आगडोंब पाहता मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.

    भिवाडीमधील खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जी १/११८ बी येथे आज सकाळी भीषण आग लागली अचानक स्फोट झाल्यामुळे आग लागलयाची माहिती समोर आली. आगीची माहिती मिळताच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

    प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग काही मिनिटांतच भडकली. कारखान्यात रसायने आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने आग अतिशय वेगाने पसरली. प्राथमिक अहवालानुसार या अपघातात आठ कामगारांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत ८ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना घडली त्यावेळी कारखान्यात २५ ते ३० जण कामगार होते. त्यामधील काहीजण सुरक्षित बाहेर पडले. पण स्फोटामुळे काहीजणांना बाहेर पडताच आले नाही. त्यांचा जळून मृत्यू झालाय. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अग्नितांडव पाहाता मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    भिवाडी, खुशखेडा आणि आसपासच्या परिसरातील सर्वच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कामाला लागले. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही, पण काही प्रमाणात कमी झालेली आहे. स्थानिक प्रशासनाने कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या काराणामुळे आग लागली? याचा तपास केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    Bhiwadi chemical factory death by burning Fire Brigade massive fire Rajasthan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.