Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»केमिकल फॅक्ट्रीत भीषण स्फोट : मृतांचा आकडा ३६ वर
    अपघात

    केमिकल फॅक्ट्रीत भीषण स्फोट : मृतांचा आकडा ३६ वर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तेलंगणामधील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटातील मृताची संध्या ३६ वर पोहचली आहे. सोमवारी (३० जून २०२५) सकाळी फार्मा कंपनीमध्ये स्फोट झाला होता, त्यामध्ये ३६ जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटेनेतील मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेलगंणामधील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी दुख: व्यक्त केलेय. पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृताच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जाहीर केलेय.

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यावेळी रेवंत रेड्डी यांनी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. रेवंत रेड्डी म्हणाले की, राज्य सरकार सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत आहे. फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

    तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील फार्मा कंपनीच्या कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात मृतांची संख्या ३६ वर पोहचली आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनेच्या ठिकाणाहून आतापर्यंत ३१ मृतदेह हाती लागले आहे. तर ५ जणांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अद्याप रूग्णालयात ३० जणांवर उपचार सुरू आहे. दुर्घटनेला २४ तास उलटून गेलेले आहेत, पण अद्याप बचावकार्य सुरूच आहे.

    पाशमिलारम एमयडीसीमधील सिगाची कारखान्याच्या रिअॅक्टर युनिटमध्ये स्फोट झाला. सोमवारी सकाळी ८.१५ ते ९.३० च्या दरम्यान रिअॅक्टरमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की १०० ते २०० फुटांवर माणसं फेकली गेली होती. स्फोट झाला त्यावेली १०० पेक्षा जास्त कर्मचारी कंपनीत काम करत होते. स्फोट इतका जोरदार होता की, तिथे काम करणारे काही मजूर १०० मीटर दूर फेकले गेले. स्फोटामुळे रिअॅक्टर युनिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बहुतांश मजूर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील आहेत.

    तेलंगणामधील स्फोटाची घटना ताजी असतानाच तामिळनाडूमधील स्फोटाची घटना समोर आली आहे. येथील शिवकाशी येथे मंगळवारी एका फटाके कारखान्यात मोठा स्फोट झाला. वृत्तानुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला हे, तर ४ जण गंभीर जखमी आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif