लोकशाही न्यूज नेटवर्क
कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसी परिसरात एका केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार कंपनीत झालेल्या जोरदार स्फोटामुळे ही आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागण्याचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की धुराचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र या दुर्घटनेत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

