सकाळचा नास्ता चटपटीत.. शिळी पोळीला बनवा ‘मसाला पोळी’

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सर्वात सोप्पी ‘मसाला पोळी’  (Masala Poli Recipe)

सकाळी सर्वाना चहा झाल्या नंतर सकाळच्या नाश्तामध्ये काहीतरी चटपटीत खावंस वाटते पण रोज सकाळी पोहे, उपमा,खमंग खाऊन बोर होतो त्याच सोबत कधी कधी शिळी पोळी लाच चहा सोबत खात असतो पण  शिळी पोळी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. म्हणून मग नुसती पोळी खाण्यापेक्षा आपण तिला मसाला पोळी करून खाऊ शकतो. मसाला पोळी लहान  मुलांना देखील फार आवडेल ,तर जाणून घेऊया मसाला पोळीची रेसिपी .

शिळी पोळी बनवण्या साठी लागणारे साहित्य ;

1)१ शिळी पोळी , २)आपल्याला हवी त्या प्रमाणात मिरची , ३)कापलेला कांदा, टोमॅटो ,कोथिंबीर, ४)चवीनुसार मीठ ,५) चाट मसाला , ६)बटर / ऑइल , ७)बारीक खिचलेली पत्ताकोबी

मसाला पोळी बनवण्याची पद्धत ; 

सर्वात आधी, शिळी पोळी  तव्यावर बटर किंवा तेल टाकून  थोडी पापड सरकी कडक  तव्यावर भाजून घ्या  चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर,पत्ता कोबी एकत्र करून त्यावर चाट पावडर, मीठ आणि तिखट करून नीट मिक्स करून एकत्र करून घ्या.

एकत्र केल्या नंतर भाजलेल्या पोळी वर तयार केलेले मिश्रण त्यावर घाला आणि मस्तपैकी गरमागरम चहा किंवा कॉफीच्या घोटासह तुम्ही मसाला पोळीची चव घ्या.आपल्या सकाळच्या नाश्त्याला चविष्ट अशी  ‘मसाला पोळी’ बनवून नाश्त्याचा आंनद घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.