यावलमधून २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारी विवाहिता न सांगता घरातुन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

सदर २३ वर्षीय विवाहिता दोन मुलींची आई आहे. दि. २७ डिसेंबरच्या सकाळी ६ वाजेपासुन आपल्या राहत्या घरातुन बेपत्ता झाली आहे. विवाहितेच्या सासरच्या मंडळीने आपल्या नातेवाईक व परिचितांकडे सर्वत्र शोध घेतले असता ती मिळुन आली नाही. अखेर या संदर्भात विवाहितेचा पती ईमरान शेख (वय ३६, व्यवसाय मजुरी, रा. बाबूजीपुरा यावल) यांनी यावल पोलीस ठाण्यात आपली पत्नी हरवल्याची फिर्याद दिल्याने ७१/२o२२ प्रमाणे मिसिंग नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.