Sunday, November 27, 2022

दिराचे विधवा वाहिनीशी लग्न; दोघ मुलींसह स्वीकार…

- Advertisement -

 

- Advertisement -

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

दोघी लेकींसह विधवा वाहिनीचा स्वीकार करून दिराने समाजापुढे विधवा पुनर्वसानाचा संदेश देऊन आदर्श विवाहाचा पायंडा पाडला आहे.

पतीच्या अकाली निधनाने वहिनीला अवेळी वैधव्य आलं. त्यातच दोघा लहान मुलींचेही बापाविना निरस आयुष्य समोर दिसत होते. त्यांच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न सर्व नातेवाईकांना पडला होता. एक दिवस नातेवाईक व मित्र परिवाराच्या बैठकीत वनिता व लहान दीर तुकाराम ह्या दोघांचे लग्न करण्याच्या विषयी सुनील पाटील यांनी माजी ग्रा.प.सदस्य अनिल महाजन, नितीन सोनार, डॉ महेंद्र निकम, अरुण पिंगळे, दीपक दुसाने, प्रकाश सोनार, देविदास सोनार, पुरूषोत्तम चव्हाण, आदींची चर्चा झाली. त्यानंतर वनिता व तुकाराम यांना समोर बसवून त्याविषयी विचरणा करून, एकमेकांची संमती घेण्यात आली. दि. २५ रोजी बांबरुड राणीचे येथील बीजासनी मातेच्या मंदिरात नातेवाईक मित्रपरिवारांच्या उपस्थित त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या