पैशांसाठी विवाहितेला जिवंत जाळण्याची धमकी; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माहेरहून पाच लाख रूपये आणावे नाहीतर जीवंत जाळून टाकेल अशी धमकी विवाहितेला दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील माहेर असलेल्या रुखसारबी शकीलखान मुलतानी (वय-३०) यांचे मेहरुण परिसरातील अक्सानगरातील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेजवळील रहिवासी शकील खान सिकंदर खान मुलतानी यांच्योबत विवाह झाला आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून व्यापारासाठी विवाहितेने माहेरुन ५ लाख रुपये आणायला लावले. मात्र पैसे आणले नाहीत म्हणून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. तसेच तुला जीवंत जाळून टाकू अशी धमकी देखील दिला जात होती.

दरम्यान, हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या होत्या. मंगळवारी त्यांनी शहर पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती शकील खान सिकंदर खान मुलतानी सासू शहनाजबी सिकंदरखान मुलतानी, नणंद शाहिस्ता शेहबाज खान, शबनमबी जाकीर खान, दीर शगीरखान सिकंदर खान, जाकीर खान सिकंदर खान सर्व रा. अक्सानगर मास्टर कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुनिल बडगुजर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.