तरुणाच्या डोक्यात फायटरने वार करीत बेदम मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

0

तरुणाच्या डोक्यात फायटरने वार करीत बेदम मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव (प्रतिनिधी): शहरातील इंदिरा कन्या शाळेजवळ काहीही कारण नसताना तिघांनी मिळून एका तरुणावर लोखंडी फायटरने डोक्यावर वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना शनिवारी ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी १० एप्रिल रोजी रात्री धरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. लहान माळीवाडा, धरणगाव) हा तरुण शनिवारी रात्री इंदिरा कन्या शाळेजवळ उभा असताना, राज पचेरवार, रोहित चौधरी आणि बाळा धनगर (तीघेही रा. धरणगाव) यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यातील राज पचेरवार याने लोखंडी फायटरने हरीशच्या डोक्यावर मारहाण केली, तर रोहित चौधरी आणि बाळा धनगर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली व शिवीगाळ करत धमकी दिली.

जखमी हरीश पाटील याला तत्काळ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याने १० एप्रिल रोजी रात्री पोलिसांत फिर्याद दिली, त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.