जुन्या भांडणातून चौघांना मारहाण ; गुन्हा दाखल

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जुन्या भांडणातून एका कुटुंबातील चौघांना मारहाण केल्याची घटना रविवारी घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, किरण गंगाराम खैरनार (वय-३४) रा. सम्राट कॉलनी, हा तरूण दुध विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरात राहणाऱ्या ललीत दिक्षीत हा त्याच्या घरी आला. त्या ठिकाणी येवून जुन्या वादातून किरणच्या शर्टाची कॉलर पकडून तू माझ्या भावाला का मारतो असे सांगून शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी किरणचा भाऊ हेमंत खैरनार, वहिनी मिनाक्षी खैरनार, आई कमलाबाई खैरनार हे आवराआवर करण्यासाठी आले असता त्यांना देखील शिवीगाळ केली. यात चौघेजण जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी किरण खैरनार याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ललीत दिक्षीत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनिल सोनार पुढील तपास करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.