Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगावमध्ये हॉटेल चालकाला मद्यपींकडून मारहाण !
    ताज्या बातम्या

    जळगावमध्ये हॉटेल चालकाला मद्यपींकडून मारहाण !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावमध्ये हॉटेल चालकाला मद्यपींकडून मारहाण !

    जळगाव ;– शहरातील गेंदालाल मिल परिसरात एका हॉटेल चालकावर दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या या चौघांना समजवण्याचा प्रयत्न हॉटेल चालकाने केला असता, त्यांनी त्याच्यावरच हात उचलला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शेख शाहरुख शेख गणी (वय २९, रा. गेंदालाल मिल परिसर) यांचे गेंदालाल मिल परिसरात हॉटेल आहे. १६ मार्च रोजी आदेश, सोन्या, आवेश आणि त्यांचा एक साथीदार असे चौघे हॉटेलमध्ये आले. दारूच्या नशेत त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

    शेख यांच्या आईने त्यांना शांततेत जेवण करण्यास सांगितले, परंतु त्यांनी ऐकण्यास नकार दिला. अखेर, शेख स्वतः त्यांना समजवण्यास गेले, त्याच वेळी या चौघांनी हॉटेल चालकावरच हल्ला चढवला आणि मारहाण केली.
    या प्रकारामुळे हॉटेल परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हॉटेल चालक शेख यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी आदेश, सोन्या, आवेश आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
    या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. जळगावमध्ये वाढत्या असभ्य वर्तनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif