दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणासह वडिलांना मारहाण
बेल्टने मारहाण आणि दगडाने हल्ला; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणासह वडिलांना मारहाण
बेल्टने मारहाण आणि दगडाने हल्ला; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी ;- शहरातील मानराज पार्क परिसरात एका अज्ञात व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले, मात्र पैसे न दिल्याने तरुण व त्याच्या वडिलांना बेल्टने मारहाण करत रस्त्यावरील दगडाने हल्ला केला. ही घटना शनिवारी, १५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घडली.
संकेत किरण बाविस्कर (वय २८, रा. गुड्डू राजा नगर, जळगाव) हे १३ मार्च रोजी पुणे ते जळगाव प्रवास करून मानराज पार्क येथे ट्रॅव्हल्सने उतरले. त्यांना घ्यायला त्यांचे वडील किरण बाविस्कर आले होते.
दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात व्यक्तीने दोघांचा रस्ता अडवला आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले.पैसे न दिल्याने आरोपीने बेल्टने मारहाण केली. रस्त्यावर पडलेला दगड उचलून संकेत व त्यांचे वडील यांच्यावर हल्ला केला.संकेत बाविस्कर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तपास पोहेकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.