Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ट्रान्सफार्मर बंद पडल्याच्या कारणावरून अभियंत्याला मारहाण ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    ट्रान्सफार्मर बंद पडल्याच्या कारणावरून अभियंत्याला मारहाण ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ट्रान्सफार्मर बंद पडल्याच्या कारणावरून अभियंत्याला मारहाण ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    जळगाव;- महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना मोहाडी गावात घडली. अभियंता जयेंद्र सपकाळे (वय २९, रा. शास्त्रीनगर) यांना सुनिल पितांबर ठाकरे (रा. मोहाडी) याने शिवीगाळ करत चार-पाच वेळा कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मोहाडी गव्हाण पाडा येथे दुपारी ३.४५ वाजता घडली.

    महावितरणच्या कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे आणि कंत्राटी कर्मचारी योगेश नाना ठाकरे (रा. कुरंगी, ता. पाचोरा) हे मोहाडी गावात वीज बिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी सुनिल ठाकरे याने फोनवर ट्रान्सफार्मर बंद असल्याची तक्रार केली. अभियंत्याने “नवीन ट्रान्सफार्मर प्राप्त होताच जोडला जाईल” असे उत्तर दिले. यावर सुनिल ठाकरेने “कसा काम करतोस?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

    थोड्याच वेळात सुनिल ठाकरे घटनास्थळी आला आणि सपकाळे यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तसेच, “तू आमच्या गावात कसा काम करतोस, तुझी नोकरीच काढतो!” असे धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली.

    या हल्ल्यात अभियंता जयेंद्र सपकाळे जखमी झाले असून, त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सुनिल पितांबर ठाकरे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif