शेताच्या व्यवहाराच्या वादातून दोघांना मारहाण

कंडारी फाट्याजवळील घटनेमुळे परिसरात खळबळ

0

शेताच्या व्यवहाराच्या वादातून दोघांना मारहाण

कंडारी फाट्याजवळील घटनेमुळे परिसरात खळबळ

जळगाव प्रतिनिधी

मामाच्या शेताच्या व्यवहारामुळे राग आलेल्या व्यक्तीने दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना कंडारी फाट्याजवळील पेपर मिलसमोर घडली. या प्रकरणी संशयित रविंद्र कोळी (रा. कांचन नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कंडारी येथील नरेंद्र वाल्मिक सोनवणे हे शेती करतात. ३ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास रविंद्र कोळी याने त्यांना कंडारी फाट्याजवळ थांबवले आणि मामाच्या (बाजीराव नारायण कोळी) शेताचा व्यवहार केल्याचा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्या हातावर व पायावर मारहाण करून जखमी केले.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कैलास रिवाजकर यांना देखील मारहाण करण्यात आली. शिवाय, त्यांच्या (एमएच १९ बीडी ००२३) क्रमांकाच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले.

घटनेनंतर नरेंद्र सोनवणे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविंद्र कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकुंद पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.