तरुणाच्या डोक्यात फारशी मारून चौघांकडून बेदम मारहाण

0

जळगाव – : एका तरुणाला काहीही कारण नसताना शिवीगाळ चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून फरशीचा तुकडा डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील समता नगरातील हनुमान मंदिराजवळ रविवार २६ मे रोजी पहाटे ३ महिन्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश श्याम धुळकर वय-२२, रा. हनुमान मंदिर, समता नगर जळगाव हा तरुण आपल्या रविवारी २६ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तो घरासमोर उभा असताना काही कारण नसताना गल्लीत राहणारे राजेश साळुंखे, सागर गायकवाड, सागर खैरनार आणि गोट्या गायकवाड या चार जणांनी शिवीगाळ करत चपटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेले फरशीचे तुकडे डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्या राकेश धुळकर याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी २६ मे रोजी राकेश धुळेकर यांनी याने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक न्यानेश्वर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.