Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रस्त्यात अडवून तरुणाला लुटणारी ‘चौकडी’ जेरबंद
    गुन्हे वार्ता

    रस्त्यात अडवून तरुणाला लुटणारी ‘चौकडी’ जेरबंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 9, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- तरुणाला चौघांनी रस्त्यात थांबवून त्याच्या हातातील चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोकड जबरीने चोरुन नेल्याची घटना जे. के पार्क परिसरात घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी चौघ संशयितां केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी शहरातील विद्युत कॉलनीतील कुणाल सोनार हा जात होता. मेहरुण तलाव परिसरातील जे. के पार्कजवळ चार अनोळखी इसमांनी त्याला अडवून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या हातील चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोकड जबरीने चोरुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    तरुणाने सांगितलेल्या वर्णणानुसार पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, ही जबरी चोरी तांबापुरा परिसरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करुन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. चौघांनी चोरी त्यांनीच केल्याचे कबुली दिली, तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल देखील हस्तत करण्यात आला आहे. संशयितांना न्या. वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्र्य पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने केली.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif