Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»घरात घुसून एकावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन जणांना अटक
    गुन्हे वार्ता

    घरात घुसून एकावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन जणांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 15, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- शहरातील रचना कॉलनी येथे एकाच्या घरात घुसून कोयत्याने डोक्याला मारून दुखापत करून घरातील वस्तूंची नासधूस केल्याचा प्रकार घडून याबाबतचौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आला होता . यातील दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    या घटनेची माहिती अशी कि, दत्त मंदिराजवळील रचना कॉलनी येथे राहणारे गोपाल मधुकर चौधरी 48 यांच्या घरात 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास आरोपी शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड अनिल रसाळ राठोड दोन्ही रा.कांचन नगर जळगाव तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी रा. कुसुंबा व अन्य एक अनोळखी यांनी गोपाल चौधरी यांच्यासह त्यांचे पत्नीला मारहाण करून घरातील वस्तूंची नासधूस केली. तसेच त्यांच्या घराबाहेर उभे असलेल्या बुलेट व स्प्लेंडर मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान करत आमचा ग्रुप मोठा असून तुला मारून टाकू अशी धमकी त्यांनी गोपाल चौधरी यांना दिली. याबाबत गोपाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता

    या गुन्ह्यातील आरोपी सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव यांना कांचन नगर परिसरातून ताब्यात घेऊन आज रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. सुनील याच्यावर यापूर्वी पाच गुन्हे दाखल असून विशाल याच्यावर दोन गुन्हे दाखल आहे . हि कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले छगन तायडे, सुधीर साळवे, इमरान सय्यद ,ललित नारखेडे, किरण पाटील ,सचिन पाटील, आदींनी केली .

    #crime jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif