मराठी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना पितृशिक

सुधाकर श्रोत्री यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुष्कर श्रोत्रीच्या वडीलांचे सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री कला, साहित्य, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्याचे मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.

सुधाकर श्रोत्री यांनी मुंबईत आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री यांची वृत्तपत्र वितरण क्षेत्रात मोठी ओळख होती. रविवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. सुधाकर श्रोत्री यांच्या पश्चात त्यांची मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल 65 वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत काम केले आहे. ते शांत स्वभावाचे, सर्वांना सांभाळून घेणारे होते.

सुधाकर श्रोत्री यांना साहित्याची आवड होती. सुधाकर श्रोत्री यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. यात ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीज स्पेशल’ आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित ‘खास सचिन’ या कविता संग्रहांचा समावेश आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (2 मार्च 2026) ला सकाळी 8 वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्कर श्रोत्रीने आजवर मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. पुष्करच्या जडणघडणीवर त्याच्या वडीलांच्या मोठा हात आहे. पुष्कर श्रोत्री उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे. पुष्कर श्रोत्रीचे सध्या ‘लाभले आम्हास भाग्य’ आणि ‘श्शssss घाबरायचं नाही’ ही दोन नाटक पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.