सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज

0

समाजाच्या हितार्थ कार्यकारिणी जाहीर…!

लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा : प्रतिनिधी
दि. १५ ऑगस्ट रोजी स्व. राजीव गांधी टाऊन हॉल, पाचोरा येथे अखिल मराठा समाज यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ग्रामीण व शहर पाचोरा तालुक्यातील सर्व मराठा समाज सोशल मिडियाच्या व्हाट्सअप द्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज, जगत गुरु संत तुकाराम महाराज यांचे प्रतिमा पूजन करून शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष मराठा नेते तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने त्यांचे आत्म्यास शांती लाभो म्हणून उपस्थितांतर्फे श्रद्धांजली वाहन्यात आली. यानंतर कार्यक्रमाची व मेळाव्याची सुरवात झाली यात प्रामुख्याने सामाज संघटन, शैक्षणिक सामजिक व सांस्त्कृतिक वारसा जपत समाजात त्याचा सामाच्या दृष्टीने उपयोग करणे, समाजातील गोर गरीब अनाथ यांना सहाय्य देणे, स्वत:ला समृद्ध करत मराठा समाजाची वाटचाल यामध्ये नव तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करत रोजगार उपलब्ध करून देणे, समाजाच्या हिताचे निर्णय घेणे इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा होऊन यात एक समाज कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, इत्यादी पदावर नवनियुक्त पदाधिकारी सर्वानुमते नियुक्त करण्यात आले. यात प्रामुख्याने
अध्यक्षपदी प्रा. डॉ. योगेश पाटील (पाचोरा), उपाध्यक्ष – नितिन पाटील (पाचोरा), कार्याध्यक्ष – धनराज पाटील (आरोग्य निरीक्षक नगरपरिषद पाचोरा), सचिव – संजय पाटील (पाचोरा ग्रुप एडमिन), खजिनदार – संभाजी पाटील (माजी सैनिक, तलाठी पाचोरा), सहसचिव – राहुल पाटील (सरपंच राजुरी), सदस्य – गोपाल पाटील (वकील पाचोरा), किशोर पाटील (महावितरण पाचोरा), संदीप मराठे महावितरण (पाचोरा), विकास पाटील (ग्रामसेवक पाचोरा), दिलीप पाटील (माजी सैनिक पाचोरा), सुरेश पाटील (माध्यमिक शिक्षक पाचोरा), सबरजिस्टर ऑफिसचे किरण पाटील, पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, सुधन हाॅस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पाटील, सारंग पाटील (माहिजी), आबाजी पाटील (पहान), मनोज पाटील शिक्षक (गोराडखेडा), पत्रकार नगराज पाटील (कुरंगी), गणेश प्रकाश पाटील वाघुलखेड़ा, पत्रकार चिंतामन पाटील (पुनगाव), निलेश वाघ (ओझर शिक्षक), सचिन कोकाटे (चिंचपुरे), अधिकार पाटील (सांगवी), कुंदन नलवाडे (निंभोरी), मनिष पाटील (वाणेगाव), गणेश पाटील (वाडी), सागर पाटील (नगरदेवळा), गणेश पाटील (टाकळी), किरण पाटील (बदरखे), हर्षल पाटील (खाजोळा), पत्रकार गणेश जनार्दन शिंदे, ग्रामसेवक चंदू सोमवंशी, अरुण पाटील (सारोळा), मुकेश तुपे (पाचोरा), अमोल पाटील (अल्टीमेट फोटो स्टूडियो, पाचोरा) असे सर्व मराठा समाज बांधव यांची निवड करण्यात आली. शेवटी नवनियुक्त अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, व सदस्यांची मनोगत व्यक्त केले. सर्व स्थरातून समाज बांधव यावेळी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार संजय पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.