Tuesday, May 24, 2022

एकता मराठा फाऊंडेशनतर्फे मराठा क्रिकेट लीग राज्यस्तरीय सामन्यांचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा एकता मराठा फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन दि. 3 एप्रिल 2022 ते 10 एप्रिल 2022 या दरम्यान शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राऊंड) येथे डे- नाईट सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उद्घाटन सोहळा दि. 4 एप्रिल सकाळी 9 वाजता होणार आहे. मराठा क्रिकेट लीग राज्यस्तरीय सामन्यात एकूण 24 संघ सहभागी झालेले आहेत. त्यात 14 संघ तालुकानिहाय व 3 संघ जिल्हानिहाय व 7 संघ शहरातून सहभागी आहेत. दि.10 एप्रिल रोजी अधिकारी विरूध्द पदाधिकारी असा प्रदर्शनीय सामना सकाळी 8.30 वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजित केलेला आहे.

त्यात अधिकारी संघाचे नेतृत्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व खेळाडूमध्ये पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपायुक्त प्रशांत पाटील व आदी अधिकारी खेळाणार आहेत. तसेच सर्व समाजातील युवकांना रोजगार मिळावायासाठी 50 हातगाड्यांचे गरजू व्यक्तींना वाटप तसेच 50 ग्रामिण भागातील अभ्यासिकांना स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे वाटप असे नियोजन केलेले आहेत.

जळगावकरांना विशेष करून युवक वर्गाला प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते नितीन बानगुडे पाटील यांचा कार्यक्रम दि.10 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता योजिले आहे. त्याचा सर्व जळगावकरांनी फायदा घ्यावा तसेच 50 गरजू व्यक्तिंनी हातगाड्या मिळविण्यासाठी दर्जी फाऊंडेशन ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये जळगांव जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा. गोपाल दर्जी यांनी केले. यावेळी प्रविण पाटील, सागर पाटील, आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन दिपक आर्डे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या