Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर
    गुन्हे वार्ता

    नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर

    'नीट' पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची अपडेट : चौकशी होणार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 17, 2026No Comments443 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिकमधून अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शुभमच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर आले असून, यात काही प्रतिष्ठित क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे एक विशेष पथक सध्या अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणातील बारकावे तपासत आहे. नीट पेपरफुटी प्रक्रियेत ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया माध्यमाचा सर्वाधिक वापर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे सीबीआय आता पुढील तपास करत आहे. तसेच, शुभम खैरनार राहत असलेल्या आणि त्याच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स सीबीआयकडून खंगाळले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत शुभमच्या संपर्कात कोण-कोण आले? त्याने कोणाशी दूरध्वनीवरून किंवा सोशल मीडियावरून संशयास्पद संवाद साधला? याचा सखोल मागोवा घेतला जात आहे.

    शुभम खैरनारच्या अटकेनंतर त्याच्या जवळच्या मित्रांची आणि इतर संबंधितांची कसून चौकशी केली जात असून त्यांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक चौकशीत शुभमने यापूर्वी काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे नाशिकमधील काही नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक देखील आता सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या चौकशीतून आणखी काही मोठे पुरावे आणि नाशिकमधील इतर संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नाशिकव्यतिरिक्त नीट पेपरफुटीचे कनेक्शन लातूरमध्ये पोहोचले आहे. एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेला रसायनशास्त्राचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. कुलकर्णी याला थेट प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश होता आणि त्यानेच एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात आपल्या नेटवर्कद्वारे प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्या संपर्कातही कुलकर्णी असल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    दरम्यान, 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आता या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून, 21 जून 2026 रोजी नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. आता सीबीआयच्या चौकशीत आणखी काय महत्त्वाची माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून शिक्षिका मनीषा मांढरे यांना अटक झाल्यानंतर मॉडर्न कॉलेज प्रशासनाने त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्या महाविद्यालयात कार्यरत असून 2002 पासून अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवत होत्या. महाविद्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1881 मधील तरतुदीनुसार चौकशी प्रक्रिया राबवली जाणार असून शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif