७० वर्षीय वृध्दाची आजाराला कंटाळून आत्महत्या

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

मनवेल येथील ७० वर्षीय वृध्द इसमाने आजाराला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी घडली. या संदर्भात मयत गोवर्धन भालेराव यांचा मुलगा संजय गोवर्धन भालेराव यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोवर्धन बळीराम भालेराव (वय ७०) वर्षीय वृद्ध ईसमाने मुत्रपिंडच्या दिर्घ आजारास कंटाळुन आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरा शेजारी असलेल्या छप्पराला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे.

घटना घडली त्या वेळेस मयत भालेराव यांच्या घरची सर्व मंडळी शेतात कामास गेले असताना नातीला चहा बनविण्यासाठी सांगितले व घराशेजारी असलेल्या छताच्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे.

मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सूना, नातंवड असा परीवार आहे. मयत गोवर्धन भालेराव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. संजय गोवर्धन भालेराव यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.