मनवेल येथे शेतकऱ्यां कडील कर्जवसुली करीता जिल्हा बँकचे पथकाकडुन वसुली मोहीम सुरु

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

मनवेल: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत मनवेल  विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कडुन घेतलेल्या कर्जाची वसुली वसूल करण्यासाठी आज मनवेल येथे जिल्हा बँकेचा  पथकाकडुन वसूली मोहीम राबविण्यात आली.

मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत मनवेल ,दगडी ,थोरगव्हाण व  पिळोदा येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या जिरायत व बागायत कर्ज घेतले आहे. या कर्जाची वसूली मोठ्या प्रमाणात थकीत आहे.

या थकबाकी वसूली करीता नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफ करण्यात आले आहे. तर गेल्या कीत्येक वर्षा पासून थकबाकी असलेल्या, शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पथकाने कर्ज वसूल करण्यात आली व थकबाकी कर्ज  बद्दल माहीती देऊन थकबाकी कर्जा नियमित कर्ज  व थकबाकी बद्दल शाषनाकडुन मिळणारे व्याज व थकबाकी मुळे होणारे नुकसान, याविषयी माहिती या पथका कडुन देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.