मनवेल, लोकशाली न्युज नेटवर्क
मनवेल येथील दोन शेतकऱ्यांचे थोरगव्हाण रोड लगत शेती आहे. या शेतातील उभ्या केळीचे घड अज्ञात माथेफेरूने विळ्याच्या साह्याने ५० केळीची झाडे कापली. यामुळे शेतकऱ्यांचे एक लाखाच्या जवळपास नुकसान झाले आहे.
मनवेल येथील महेंद्र हुकुमचंद पाटील यांची थोरगव्हाण रस्त्यावर गट. न. १०० व जंयत रमांकात पाटील यांच्या गट. न . १७० मध्ये दोन्ही शेतकऱ्यांनी जैन टिश्युचे रोप असलेली नवती केळी लागवड केली आहे. केळीचे निसवन झालेले ५० घड अज्ञात माथेफेरूने विळ्याने कापुन नुकसान केल्याने एकच खळबळ उडाली.
ही घटना 3 एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून सायंकाळी शेतमालक शेतात फेरफटका मारायला गेला असता केळीचे निसवन झालेले घड अर्धीमधुन कापुन पडलेले दिसून आले आहे. याप्रकरणी अज्ञात माथेफेरू विरुद्ध यावल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येत आहे. सदर प्रकार गंभीर असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्या माथेफेरूचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.