Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाला धडकी देणारी कसरत
    लोकशाही विशेष

    पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाला धडकी देणारी कसरत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 21, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनवेल ता. यावल, लोकशाही विशेष 

    गोकुळ कोळी

    “एक झोका, चुके काळजाचा ठोका..” चौकट राजा या प्रसिद्ध मराठी चित्रपटासाठी हे आशा भोसलेंनी गायलेले गीत अगदी समर्पक वाटावे असे काहीसे चित्र समाजात अनेक वेळा फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकली मुले सादर करतांना दिसून येतात. मुळात अल्पवयीन मुलांनी काम करणे हा कायद्याने गुन्हा समजला जातो. मात्र पापी पोटाची आग शमवण्यासाठी आजही काही भटक्या जमातीतील अल्पवयीन मुले-मुली दोरी वरची कसरत करताना दिसत आहेत. खरे तर याचा विचार करून सरकारी यंत्रणाने या घटकांसाठी योग्य ती दिशा देऊ करणे गरजेचे आहे.

    पाठीवर बिऱ्हाड घेऊन भटकंती करणारे हे भटक्या जमातीतील डोंबारी, पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी जाऊन कसरतीचे खेळ दाखवतात. त्यात अवघ्या १२ ते १४ वर्षाची मुलगी जीव धोक्यात घालून दोरीवरची कसरत करते. काळजाचा ठोका चुकविणारे तिचे दोरीवरचे खेळ उपस्तीतांची टाळ्यांची दाद मिळवून जातात. बक्षिसरुपी पैसे व शाबासकीही मिळते. मात्र त्या अल्पवयीन मुलीच्या भवितव्याचे काय असा प्रश्न खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.

    अगदी सकाळीच एखाद्या गावाच्या रस्त्यावर, चौकात ढोलकीचा आवाज सुरू होतो. ढोलकीचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू लागते. आई-वडिलांच्या हाता खांद्यावर बागडण्याच्या, शाळेत जाण्याच्या वयात ती अल्पवयीन चिमुकली जीवावर बेतेल असे कसरतीचे खेळ करून दाखवते.

    जमिनीपासून १० फूट उंचीवर काठीच्या सहाय्याने बांधलेल्या दोरीवर त्या चिमुकली चे खेळ पाहण्यासाठी आलेले थबकतात. स्वतःचा तोल सांभाळत कधी दोरीवरुन चालायचे तर कधी दोरीवर एकावर एक रचलेल्या प्लेटवरून चालायचे अशी ही जीवघेणी, चित्तथरारक कसरतीचे प्रयोग ती अल्पवयीन मुलगी करून दाखवते. या भटक्या जमातीच्या लोकांकडे उपजीविकेसाठी दुसरे कसलेच साधन नसल्याने यांचा प्रवास असाच सुरू असतो.

    सध्या या लोकांचे खेळ मनवेल परिसरात सुरू असून, ठिकठिकाणी ही कसरत पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासनाने साक्षरता अभियान व अन्य समाजापयोगी उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांना उपयुक्त ठरतात. मात्र या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचत नाहीत. अशा भटक्या जमातीतील मुला-मुलींना शैक्षणिक उपक्रम कधी कामी येणार, ही जीवघेणी कसरत कधी थांबणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

    manvel
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!

    May 12, 2026

    मातृदेवो भव… शब्दांच्या पलीकडचं एक अथांग अस्तित्व!

    May 12, 2026

    भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif