यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

0

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामा विमा भरपाईपासून वंचीत राहू नये यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने कदिर खान यांच्या कार्यालयात शेतकरी मदत केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे यांनी दिली.

यावल तालुक्यातून खरीप पिकांच्या शेतक-याने पिकविमा काढला आहे आहे. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार निवारणासाठी यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने मेनरोड यावल कादिर खान यांचे कार्यालयात शेतकरी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी आपले नावे नोंदवावी. नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना काँग्रेस कमिटीचे प्रदेश स्तरावरून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला ज्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीपेक्षाही कमी अगर न मिळालेल्या शेतक-यांनी ९ डिसेंबरपर्यंत आपली नावे नोदवावी, पिक विमा असलेला सातबारा, नोंदणी केलेली पिकविमा पावती हे घेवून नाव नोंदवावी असे अवाहन यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.