मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण कालुसिंग पाटील रा. मनवेल ता. यावल जि.जळगाव हे दोन मुले आणि सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात घुसून अरूण पाटील यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटात चोरी करत होते. शुक्रवार २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कपाटाचा खळखळ आवाज आल्याने अरूण पाटील हे झोपेतून जागे झाले तर दोन चोरटे डोक्यात टोपी घालून चोरी करत होते. अरूण पाटील यांना पाहून चोरटे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी अरूण पाटील याचा मुलगा तेजभान अरूण पाटील यांनी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी गावात धनसिंग सोमा पाटील यांचा स्वंयपाक घरातील पेट्या व इतर ठिकाणी शोधाशोध केली असता, काहीच हाती आले नाही तेथून सरळ शांताबाई मांनसिंग पाटील यांचा घराचा जवळ गेले असता या महिलेला जाग आली असता श्याम पाटील सर यांना फोन लावत असताना चोरट्यांनी पळ काढला.
तेथून थेट मा पस सदस्य अरुण पाटील यांचे बंधू अँड रणजित पाटील यांच्या रुममध्ये शोधाशोध करून रोख रक्कमसह दागिने लंपास केला.
सकाळी फैजपुर येथील डी.वाय.एस.पी.डॉ. सोनवणे, यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी भेट दिली. श्वानद्वारे परीसर पिंजून काढण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र खैरनार करीत आहे.