Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मंत्रालयासाठी नवी सहइमारत !
    महाराष्ट्र

    मंत्रालयासाठी नवी सहइमारत !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 16, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला असला, तरी आता मंत्रालयाला लागूनच मंत्रालय ॲनेक्सची पाच मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. 110 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीमध्ये 20 मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दालने उपलब्ध होतील. शिवाय अभ्यागतांसाठीही सोयीसुविधा असतील. नव्या इमारतीचे बाह्यस्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सध्या 40 मंत्री आहेत. मागच्या उद्धव ठाकरे, तसेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळातील काही जागा विस्तारासाठी शिल्लक ठेवण्यात आल्या होत्या. साहजिकच मंत्रिमंडळात कमी मंत्री असल्याने यातील बहुसंख्य मंत्र्यांनी इतरांची कार्यालयेही काबीज केली होती. ती पुढे तशीच राहिली होती. नोव्हेंबर 2024मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या थेट 40वर पोहोचली. मंत्र्यांची कमाल संख्या जवळपास पूर्ण झाल्याने अनेक राज्यमंत्र्यांना मंत्रालयात दालनेच शिल्लक राहिली नाहीत.

    काही मंत्र्यांना विधानभवनात, तर काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जागा देण्यात आली. मंत्र्यांची कार्यालये मंत्रालयाबाहेर फेकली गेल्याने त्याचा परिणाम विभागाच्या कामकाजावर जाणवू लागला आहे. त्यामुळे काही राज्यमंत्र्यांकडून सोयीसुविधांनी युक्त असलेली कार्यालये मिळावीत, त्यांना भेटायला राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जनतेला पुरेशी बसण्याची आसनव्यवस्था असलेली कार्यालये हवीत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बांधकाम खात्यातील अनुभवी आणि तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने इमारत बांधकामाचा कार्यारंभ आदेश 1 एप्रिल, 2025 रोजी काढला. मंत्रालयाची नवी इमारत 100 दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून इमारतीसाठी जागा शोधण्यापासून ते विविध परवानग्या मिळवण्यापर्यंत; तसेच मंत्रालय परिसरातील दिवसभराची वर्दळ आणि इमारतीचा पाया खणताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांचा सामना करून नवी इमारत ऑगस्ट 2025पर्यंत बांधून पूर्ण केली जाणार आहे.

     

    अशी असतील वैशिष्ट्ये !

    प्री फॅब या आधुनिक तंत्राने सिमेंट आणि स्टील यांच्या मिश्रणाने पर्यावरणपूरक इमारत विक्रमी वेळेत उभी राहणार, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार मंत्री दालने आणि त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी कार्यालय, मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी प्रत्येक मजल्यावर बैठक कक्ष, तळमजल्यावर अभ्यागतांसाठी चहापानाची सुविधा असलेले कॉफी हाऊस असणार आहे.

    #maharashtra mantralay Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये

    May 10, 2026

    पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण

    May 10, 2026

    ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif