Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनपा निवडणुकीसाठी २,८११ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; गैरहजर ९९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
    जळगाव

    मनपा निवडणुकीसाठी २,८११ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; गैरहजर ९९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 6, 2026No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपा निवडणुकीसाठी २,८११ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; गैरहजर ९९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

    जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महापालिकेकडून नियुक्त २ हजार ८११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण दोन सत्रांत पार पडले असून, निवडणूक साहित्य वाटपापासून मतदान प्रक्रिया, साहित्य जमा करणे तसेच मतमोजणीच्या दिवसापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

    दरम्यान, या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ९९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक कामकाजात दिरंगाई अथवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

    महापालिकेतर्फे सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात निवडणूक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी व निवृत्ती गायकवाड यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, नियमावली, आचारसंहिता तसेच संभाव्य अडचणींवर कसे मात करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

    या प्रशिक्षण कार्यक्रमास महापालिकेच्या उपआयुक्त निर्मला गायकवाड, उपआयुक्त पंकज गोसावी यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, जितेंद्र कुवर, महेश चौधरी, मंजुषा घाटगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश कोळी, ज्योती वसावे, ज्योती गुंजाळ, विजय सूर्यवंशी, विनोद पाटील, अविनाश गांगोडे, शीतल राजपूत, मंजुश्री गायकवाड, दादाजी जाधव, मंगेश देवरे, नितीन बागुल, विजय मराठे, विशाल सुर्वे, प्रकाश पाटील, जयंत शिरसाठ, घुष्णेश्वर साळुंखे, प्रसाद पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची असून, सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026

    सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!

    November 6, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif