Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनपात ७५० ईव्हीएमच्या बॅटरी व मेमरी कार्डांचा साठा दाखल
    जळगाव

    मनपात ७५० ईव्हीएमच्या बॅटरी व मेमरी कार्डांचा साठा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2025Updated:December 11, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपात ७५० ईव्हीएमच्या बॅटरी व मेमरी कार्डांचा साठा दाखल

    जळगाव प्रतिनिधी जळगाव महापालिका निवडणुकीच्या तयारीत एक महत्त्वाचा टप्पा पार करत ७५० ईव्हीएम मशिन्सच्या बॅटरी आणि मेमरी कार्डांचा मोठा साठा बुधवारी (१० डिसेंबर) महापालिकेत दाखल झाला. हैदराबाद येथील ECIL कंपनीमार्फत पाठविण्यात आलेले हे साहित्य मनपा प्रशासनाने व्हिडिओ चित्रणाच्या उपस्थितीत ताब्यात घेतले.

    ईव्हीएमसंबंधीच्या सर्व प्रक्रियांसाठी जबाबदार असलेल्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या उपस्थितीत हे संपूर्ण साहित्य ट्रकमधून उतरविण्यात आले. निवडणूक प्रक्रियेनुसार कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून प्रत्येक यंत्राची स्थिती, क्रमांक, तसेच मेमरी व बॅटरींची कार्यक्षमता यांची काटेकोर तपासणी करण्यात आली.

    तपासणीची जबाबदारी नगररचना विभागाचे सहायक संचालक राजेश महाले, रचना सहायक अतुल पाटील, निवडणूक अधीक्षक दीपक फुलमोगरे आणि मनपातील नियुक्त कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. सर्वांनी मिळून ७५० ईव्हीएमचे घटक एक-एक करून तपासले आणि त्यानंतर संपूर्ण साहित्य मनपाच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या सील करून ठेवण्यात आले.

    तसेच, इव्हीएम साहित्याची वाहतूक, उतरवणे आणि स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठी उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, संदिप मोरे, अतुल पाटील, सुमित पाटील, शालीग्राम लहासे, भोजराज काकडे, अमोल पखाले, कैलास कोष्टी, संतोष सपकाळे या अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी होती.

    मेमरी कार्ड व बॅटरी स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठीची तांत्रिक तयारी आता अधिकृतरीत्या पूर्ण झाली असून पुढील निवडणूक प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

    EVM batteries and memory cards halgaon Municipal Corporation
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif