‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मनपाच्या ४५० सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने वितरित

0

स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मनपाच्या ४५० सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने वितरित

जळगाव: शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका व मे कॅम फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत प्रशिक्षण व पीपीई किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक आयुक्त उदय मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात मनपाच्या ४५० सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित साफसफाईचे प्रशिक्षण देण्यात आले.

सफाई कर्मचाऱ्यांना अॅप्रॉन, हेल्मेट, हँड ग्लोव्ह्ज, बूट आणि मास्क या सुरक्षेसाठी आवश्यक साहित्याचा समावेश असलेल्या पीपीई किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, कक्ष प्रमुख आनंद चांदेकर, शहर समन्वयक राजेश पाटील, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.