३१ मार्चपर्यंत शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा – डॉ. विद्या गायकवाड

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा व याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा याकरिता मनपाने थकीत रकमेवर शास्ती माफीची अभय योजना लागू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त यांनी दिनांक 5 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत घेतलेला आहे.महापालिकेच्या मिळकत थकबाकी वसुलीचे ३१ मार्चपर्यंत शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिले. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात प्रभाग समिती क्रमांक एक ते चार अंतर्गत असलेले मालमत्ताकर वसुली नियंत्रण अधिकारी, प्रभाग अधिकारी, पथकप्रमुख, कर अधीक्षक व सर्व प्रभाग समिती कार्यासन लिपिक यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

डॉ. गायकवाड म्हणाल्या, की मिळकत थकबाकी वसुलीच्या ‘अभय शस्ती’ योजनेस शहरातील मालमत्ताकर थकबाकीदारांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार (ता. १७)पर्यंत निव्वळ ८५ कोटी ४८ लाख वसुली झाली आहे. 18 रोजी प्रभाग समिती क्रमांक 1 व प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत असलेल्या मालमत्ता थकबाकी मिळकत धारकांवर जप्तीचे अधिपत्र बजवून कारवाई करण्यात आली.

त्यात आठ कोटी २८ लाख रुपये नागरिकांना शास्ती माफ झाली आहे. एकूण वसुली ९३ कोटींपर्यंत पोचली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. शंभर टक्के शास्ती माफीचा लाभ देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम अन्वये जप्तीची धडक कारवाई करा.

प्रत्येक पथकप्रमुखांना रोज पाच थकबाकीधारकांवर अधिनियमांतर्गत धडक कारवाई करण्याचे टार्गेट दिले. ३१ मार्चपर्यंत निव्वळ वसुली १०० कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे पथक उद्दिष्ट पूर्ण करणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. जे चांगली कामगिरी करतील, त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
प्रभाग समिती क्रमांक 3 मधील मालमत्ता थकबाकीदार असलेले बिल्डर सुमित मुथा यांचे मोहाडी रोडवरील इंपेरियल अपार्टमेंट मधील 1 ते 16 फ्लॅट धारकांपैकी 9 फ्लॅट धारकांचे नळ कनेक्शन थकबाकीच्या कारणास्तव बंद करण्याची कारवाई करण्यात आली सदर अपार्टमेंट कडे थकीत रक्कम 1 लक्ष 58 हजार 251 एवढी मालमत्ता कर थकीत आहे.

प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या रामेश्वर कॉलनीतील जे टी एल मोबाईल टॉवर वरील थकीत मालमत्ता करापोटी सील केलेले होते. परंतु त्यांच्याकडून थकबाकी पोटी 4 लक्ष 17 हजार 312 चा डी.डी.प्राप्त झाल्याने सदर मोबाईल टॉवरचे सील जप्ती पथकाकडूनउघडण्यात आले.

सदर मोहिमेत प्रभाग समिती क्रमांक 3 चे प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण,कर अधीक्षक राजेंद्र भोळे संजय पाटील संजय चौधरी जगदीश बाविस्कर रवींद्र मराठे आदी कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.