तारक मेहता का उलटा चष्मामधील काही कलाकारांनी घेतला अखेरचा श्वास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आले आहे. मात्र गेल्याकाही वर्षांमध्ये मालिकेतील काही कलाकारांनी अखेरचा श्वास घेतल्याने चाहत्यांना याचा धक्का बसला आहे .

शुक्रावारी सुनील होळकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत अनेक हिंदी आणि मराठी मावलिकांमध्ये काम करणारे अभिनेते सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूनील होळकर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

मालिकेत डॉक्टर हाथी भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते कवी कुमार आझाद यांनी २०१८ साली अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि टीव्ही विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कवी कुमार आझाद यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झालं होतं.

नट्टू काका यांचं निधन
अनेक वर्षांपासून कर्करोगाला झुंज देणाऱ्या नट्टू काका अर्थात तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

अरविंद मार्कंडेय यांचं निधन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रॉडक्शन कंट्रोलरचे प्रमुख अरविंद मार्कंडेय यांनीही 2016 मध्ये आपल्या कुटुंबासह आणि चाहत्यांचा निरोप घेतला. अरविंद मार्कंडेय यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.