लोकशाही संपादकीय लेख

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून खडक उपोषणाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात गेल्या तीन वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या खेळ चालला आहे. शासनाने शब्द द्यायचा आणि मी उपोषण सोडायचे.. पण मराठा समाजासाठी हा खेळ चालू आहे. आता आर या पारची लढाई मी लढणार आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात मी बाज टाकून उपोषणाला बसणार आहे. या कडक उन्हात तापमानाचा पार 45 अंशावर असताना मी माझ्या जीवाची परवा करणार नाही. एक घाव की दोन तुकडे.. एकदाचे होऊन जाऊ द्या… मी माझ्या जीवाची परवा केली तर माझ्या मराठा मुलांनाही आरक्षण कधीच मिळणार नाही. त्या मराठा मुलांसमोर माझ्या जीवाची लाहीलाही झाली तरी चालेल पण मी उपोषण सोडणार नाही. गेल्या तीन वर्षात अनेक वेळा सरकारने आश्वासने दिली. सरकारने आश्वासने द्यायची आणि ती पाळायची नाहीत, असा त्यांचा समज करून घेतला आहे. आता मी लखलखत्या उन्हात बाज टाकून उपोषण करणार. एकतर जरांगे राहील अन्यथा आरक्षण मिळेल. त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, याची मला खात्री झाली आहे. त्यासाठी आता हे टोकाचे उपोषणाचे पाऊल मी उचलणार आहे. माझ्या मराठा बांधवांना माझी कसलीही चिंता करू नये. अंतरवाली सराटी मध्ये मी हे उपोषण बाज टाकून करणार आहे. मनोज जरंगे पाटलांनी हा उपोषणाचा निर्धार केला आहे. हे उपोषण मनोज जरांगे पाटलांनी करू नये, म्हणून आता अनेक जण प्रयत्न करत आहेत. विशेषतः मंत्री मंडळातील मंत्री प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण करू नये अशी विनंती केली आहे. एका भेटीनंतर आता दुसऱ्यांदा ते मनोज जरंगे पाटलांच्या भेटीला येणार आहेत. भेटीची वेळ त्यांना मागितली आहे. तुम्ही उपोषण करू नका.. समन्वयाने प्रश्न सुटेल.. आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी तयार आहेत, म्हणून आपण उपोषण करू नये… असा आग्रह प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांच्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील बिलकुल साथ देत नाहीत. ‘मी माझ्या उपोषणावर ठाम आहे’, असं जरंगे पाटील म्हणाले. या उपोषणाबाबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करण्याचा मानस सोडून द्यावा असे आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा इरादा कायम आहे. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण म्हणजे मनापासून केलेले असते. आता तर ते म्हणतात की पहिल्या दिवसापासून मी पाणी सुद्धा घेणार नाही. एकदा जीवाचे काय होईल ते होवो, पण कडक प्रकारे उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी वाहिलेले नेतृत्व आहे. मराठा समाजासाठी ते काहीही करायला तयार असतात. तीन वर्षांमध्ये त्यांनी अनेक वेळा उपोषण केले, ते टोकाचेही झाले. परंतु काही आश्वासनामुळे ते सोडले. परंतु माझी फार निराशा झाली. आता एकतर सरकारचा तरी मुद्दा पडेल अथवा माझा तरी मुद्दा पडेल. परंतु आता माघार नाही. हे जरांग पाटलांचे शब्द आहेत. त्यांनी 45 अंशाचा तापमानात उपोषण करायला नको, त्यांनी ते करू नये अशी आमची इच्छा आहे. परंतु मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी वाटेल ते करायला तयार असतात..!


