जळगाव ;- शहरातील दिव्यांग साधना संघातील दिव्यांग बंधू – भगिनी सोबत इतर २५ दिव्यांग बांधवांना जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी तर्फे दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला.
दिवाळी सर्व दूर आनंदाने साजरी होत असताना मुस्लिम मनीयार बीरादरिने दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींना दिवाळीचा शिधावाटप केला. . शिधा मधील वस्तू या प्रत्येक किट मध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, दोन किलो तेल, अर्धा किलो बेसन पीठ, एक किलो गूळ, एक किलो मुगाची डाळ, एक किलो उडदाची डाळ, एक किलो तूरडाळ, खोबरेल तेलाची एक बाटली या वस्तूंचा समावेश आहे एक किट सुमारे एक हजार रुपयांचा तयार करण्यात आलेला असल्याची माहिती बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी दिली.
दीव्यांग बांधवांना रथ चौक येथील मन्यार बिरादरीच्या कार्यालयात सन्मानाने दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कासोदा अध्यक्ष लतीफ सेठ, धरणगाव प्रमुख नईम खान, नशिराबाद प्रमुख फजल कासार,जळगाव शहर अध्यक्ष अब्दुल रऊफ रहीम, एंजल फूडचे दानियल शेख, समीर शेख, युवा बिरादरी चे अख्तर शेख , शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.
दिव्यांग साधना संघाचे राज्य अध्यक्ष विठ्ठल पाटील व विभागीय अध्यक्ष मनोहर शिंदे यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी मुस्लिम मनियार बीरादरीचे आभार मानले.