Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोकाटेंच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती
    ताज्या बातम्या

    कोकाटेंच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोकाटेंच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती
    एक लाखांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर ; दोषसिद्धी मात्र कायम
    मुंबई : बनावट कागदपत्रे व फसवणूक प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते व माजी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली असून, एक लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील दोषसिद्धीला स्थगिती देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे.
    कोकाटेंवर उत्पन्नाबाबत खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी (EWS) असलेल्या शासकीय योजनेअंतर्गत सदनिका मिळविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना दोषी ठरवून नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात कोकाटेंनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
    या अपीलवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने प्रथमदर्शनी उपलब्ध पुरावे लक्षात घेता कोकाटेंचा या प्रकरणातील सहभाग दिसून येतो, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे दोषसिद्धी कायम ठेवत शिक्षेला स्थगिती देण्यात आली. शिक्षेवर स्थगिती दिल्याने कोकाटेंना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी दोषसिद्धी कायम राहिल्याने त्यांच्या राजकीय व कायदेशीर अडचणी पूर्णतः संपलेल्या नाहीत.
    या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून, पुढील सुनावणी व अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif