मऊ लुसलुशीत आंब्याचा स्वादिष्ट शिरा

0

 खाद्यसंस्कृती विशेष

आंब्याचे नाव काढल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आपण नेहमी आंब्याचा रसच खातो पण आज आपण मऊ लुसलुशीत आंब्याचा स्वादिष्ट शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

 

साहित्य 

1 मोठी वाटी रवा खमंग भाजून घेतलेला

3/4 वाटी हापूस आंब्याचा रस

1/4 वाटी साखर

2 वाट्या दूध

2 टेबलस्पून ड्रायफ्रूट बारीक करून

1 वाटी साजूक तूप

चिमूटभर मीठ

1/2 चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर केसर

 

कृती 

रवा प्रथम कोरडाच कढईत छान परतून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा. नंतर त्याच कढईत साजूक तूप घालून आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स छान परतून घेऊन नंतर बारीक करून ठेवा.

ड्रायफ्रूट्स तुपात परतून झाल्यावर त्याच तुपात रवा टाकावा तोही खमंग परतून हलका झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ आणि दूध घालावे व नीट मिक्स करून मंद आचेवर दोन मिनिट झाकून ठेवावे.

रवा चांगला फुलून येतो नंतर त्यात साखर आणि आंब्याचा रस घालून नीट परतून पुन्हा एकदा दोन मिनिटांसाठी झाकून ठेवावं. नंतर झाकण उघडून त्यात वेलची पावडर आणि केसर घालावे नीट मिक्स करून गरमागरम सर्व्ह करावे.

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.