Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दलित वस्ती सुधारणांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर- आ. मंगेश चव्हाण
    जळगाव

    दलित वस्ती सुधारणांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर- आ. मंगेश चव्हाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

    ग्रामीण भागातील दलित वस्त्यांच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू केली आहे, याअंतर्गत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव मतदारसंघासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

    दलित वस्ती विकासासाठी प्रथमच भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत. सदर कामे चांगल्या गुणवत्तेची व लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

    गावाचे नाव, मंजूर कामाचे नाव व मंजूर निधी

    १) सायगाव येथे नवेगाव मातंगवाडा येथे रस्ता सुधारणा करणे व भूमिगत गटार बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    २) दहीवद येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ३) दस्केबर्डी येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) 10 लाख

    ४) भऊर येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ५) सायगाव येथे दलित वस्तीत चौक सुशोभीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ६) चांभर्डी खु येथे भूमिगत गटार व रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ७) डोनदिगर येथील दलित वस्तीतील चौक सुशोभीकरण करणे 10 लाख

    ८) कळमडू येथे दलित स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे (ता. चाळीसगाव) 10 लाख

    ९) देवळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभामंडप बांधकाम करणे 20 लाख

    १०) कृष्णानगर येथे दलित वस्तीत बौध्द विहाराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.चाळीसगाव 20 लाख

    ११) करमूड येथे संत रविदास सामाजिक भवन व स्मारक बांधकाम करणे 15 लाख

    १२) लोंढे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    १३) वाघळी विकासो ते दलित वस्ती कडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता.चाळीसगाव) 10 लाख

    १४) पातोंडा येथे दलित वस्तीत सुलभ शौचालय बांधकाम करणे 15 लाख

    १५) वडाळा दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    १६) पिंपरखेड येथे दलित वस्तीच्या स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख

    १७) पिंपळगाव येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    १८) मेहुणबारे येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 20 लाख

    १९) आडगाव येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    २०) गणेशपूर येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    २१) करजगाव येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव) 10 लाख

    २२) टाकळी प्र.चा. येथ जिजाऊ नगर कडून दलित वस्ती कडे जाणारा पोहोच रस्ता नवीन अंगणवाडी पर्यंत सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    २३) बोढरे येथे दलित वस्ती स्मशानभूमी बांधकाम व अनुषंगिक कामे करणे. (ता. चाळीसगाव) 15 लाख

    २४) टाकळी प्र.दे. येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये इंदिरानगर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत अंडर ग्राउंड गटार तयार करणे 10 लाख

    २५) टाकळी प्र.दे. येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये फुला पुंडलिक पवार यांच्या घरापासून ते मधुकर सुदाम यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे 10 लाख

    २६) वलठाण येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) 10 लाख

    २७) उंबरखेड येथे दलित वस्ती पोहोच रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) 10 लाख

    २८) रोकडे येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    २९) नांद्रे येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 15 लाख

    ३०) शिदवाडी येथे दलित वस्तीत चौक सुशोभीकरण करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ३१) शिरसगाव येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ३२) वाघारी तांडा येथे दलित वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव) 5 लाख

    ३३) राजमाने येथे दलित वस्तीत जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 5 लाख

    ३४) आभोने तांडा येथे दलित वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता. चाळीसगाव) 5 लाख

    ३५) सुंदर नगर येथे दलित वस्ती कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण व सुधारणा करणे. (ता.चाळीसगाव, जि. जळगाव) 5 लाख

    ३६) इच्छापूर येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे. (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) 10 लाख

    ३७) चैतन्य तांडा येथे संगम गार्डन समोर दलित वस्तीत कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. (ता.चाळीसगाव, जि. जळगाव) 5 लाख

    ३८) वाघले (लहान वाघले तांडा ) दलित वस्तीत कडे रस्ता सुधारणा करणे. (ता.चाळीसगाव) – 5 लाख

    #chalisgaon BJP MLA Mangesh Chavan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif