जळगावातून वृद्धेचे मंगलसूत्र लांबविले

0

जळगाव ;- शहरातील नूतनवर्षा कॉलनीतून एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र एका भामट्याने लांबविल्याची घटना ३ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहाबल जवळील नूतन वर्षा कॉलनीत राहणाऱ्या प्रेमलता नारायण सोनवणे वय ७० या घराबाहेर कचरा फेकण्यासाठी जात असताना एका ३० ते ३५ वर्षीय युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र १० हजार रुपये किमतीचे गळ्यातून ओरबाडून तोडून नेले. याप्रकरणी १७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनी शिल्पा पाटील करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.