Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»का रे हा दुरावा !
    लोकशाही विशेष

    का रे हा दुरावा !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 25, 2025Updated:March 26, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मन की बात (दीपक कुलकर्णी)

    नैसर्गिक साधन संपत्तीने सुजलाम्‌ सुफलाम्‌ असलेल्या जळगाव जिल्ह्याला विकासाची नितांत निर्माण झाले आहे. वाढती बेरोजगारी, खुंटलेला विकास यावर सर्वपक्षीय नेतृत्वाने लक्ष देऊन काम करणे महत्त्वाचे झाले आहे; मात्र आपले राजकीय पुढारी एकमेकांवर चिखलफेक करून स्वतःचा उल्लू साध्य करण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत. एकमेकांवर अतिशय खालच्या दर्जाची टीका करुन काय साध्य होईल देव जाणो ! भाजपमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा सामना सध्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसत आहे. खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर त्यांचा विषय भाजपाने थांबविणे क्रमप्राप्त आहे.

    विरोधी पक्षात खडसेंचे बस्त्यान देखील बसले असून ते राष्ट्रवादी (शप) गटाचे आमदार देखील आहेत. मात्र जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी असलेले मंत्री गिरीश महाजन कुठल्याही विषयात खडसेंना टार्गेट करुन काय सिद्ध करत आहेत हे कळत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाजन यांनी खडसेंना टार्गेट करुन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर भाष्य केले, ते भाष्य सर्वसामान्य नागरिकांना मुळीच रुचलेले नाही. महाजन- खडसे यांच्या सामन्यात शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेत खडसेंना कात्रीत पकडण्याचा प्रयोग सुरू केला आहे. जिल्ह्यात एक केंद्रीय राज्यमंत्री, तीन राज्यातील कॅबिनेट मंत्री एवढा मोठा डोलात असतानाही विकासाबाबत एकही मंत्री व आमदार, खासदार बोलताना दिसत नाहीत. गल्लीतले प्रश्न दिल्ली दरबारी मांडून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधने सोपे असतानाही पुढारी मात्र आरोप-प्रत्यारोपात दंग झालेले दिसून येत आहेत. मागील उखाड्या- पाखाड्या काढण्यात हे मंत्री दंग झाल्याने जिल्ह्याचा विकास मात्र खुंटला आहे.

    शेतकरी, कष्टकरी, दीन- दुबळे, बेरोजगार, तरुण, महिला विविध संकटांचा सामना करीत असतानाही आपली यंत्रणा मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहे. गेंड्याची कातडी अंगावर घ्यावी त्या प्रमाणे कारभार अजून किती दिवस सुरू राहणार हाच मोठा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. वारंवार मागणी करून ही रस्ते, पाणी यासह दैनंदिन गरजा देखील पूर्ण होत नाहीत. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी शासकीय उंबरठे नागरिकांना झिजवावे लागत आहेत हे या सरकारचे अपयशच म्हणावे लागेल. जनता दरबाराच्या नावाखाली अधिकारी, लोकप्रतिनिधी केवळ फोटोसेशन करण्यातच मग्न असल्याचे यातून दिसून येते. आपल्या शेजारील संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार विकासाच्या बाबतीत चार पाऊल पुढे असतानाही आपल्या मंत्र्यांना त्याचे कुठलेही सोयर सुतक दिसून येत नाही.

    गिरीश महाजन एक जबाबदार मंत्री असताना केवळ एकनाथ खडसेंना टार्गेट करून महत्त्वाच्या विषयाला बगल देताना दिसून येत आहेत. खडसेंनी आपल्या काळात काय केले हे गिरीश महाजन वारंवार सांगत असले तरी हेच गिरीश महाजन गतकाळात खडसेंच्याच लाल दिव्याच्या गाडीत हिंडत होते हे जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. खडसे तेव्हा चुकले असे गिरीश महाजन यांना आताच का वाटत आहे ? आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून असेच राजकारण सध्या जिल्ह्यात आणि राज्यात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून दिल्लीच्या तख्तापर्यंत भाजपाची एक हाती सत्ता असतानाही जिल्ह्याचा विकास मात्र कासव गतीने का होत आहे ? याचा अभ्यास करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर येवून ठेपली आहे. एकेकाळी एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील हे महायुतीच्या माध्यमातून सत्तेच्या सारीपाटावर मांडीला मांडी लावून बसलेले आपण पाहिले आहे. आताच यांच्या ऐवढा मतभेद का ? आणि कशासाठी ? या लोकप्रतिनिधींनी हातात हात घालन जिल्ह्याचा विकास करणे हे अपेक्षित आहे. या महोदयांमधील हा दुरावा जिल्ह्यासाठी घातकच म्हणावा लागेल. ‘का रे दुवारा?’ असा प्रश्न आता पडू लागला आहे.

    दीपक कुळकर्णी
    मो. ९९६०२१०३११

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Eknathrao Khadse girish mahajan Gulabrao Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण

    November 8, 2026

    दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

    November 6, 2026

    होमिओपॅथी की मॉडर्न मेडिसिन? भाग २

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif