मन की बात
अवकाळीच्या ‘अवकळा’!
दोन आठवड्यांपासून खान्देशातील वातावरणात मोठा बदल होत असून हा बदल शेतीसाठी धोकादायक ठरत आहे. शनिवार व रविवारी रावेर, चोपडा व जळगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गारपीट व वादळी पाऊस झाल्याने बळीराजासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. भर उन्हात गारपीट आणि पाऊस झाल्याने केळी, मका या सारख्या महत्वाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. निसर्गाचा हा समतोल का ढासळत आहे यावर या निमित्ताने मंथन आणि चिंतन होणे आवश्यक झाले आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, मानवनिर्मिती अतिक्रम हे मुख्य विषय पुढे आल्याने निसर्गाचा कोप होतो आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्याची वेळ येवून ठेपते.
जेव्हा लोक वादळांमुळे निर्माण होणाऱ्या सर्वात धोकादायक धोक्यांबद्दल विचार करतात तेव्हा सामान्यत: चक्रीवादळे लक्षात येतात. तरीही एकूण नुकसानाच्या बाबतीत, गारपीट खरोखरच समोर आणि मध्यभागी असायला हवी. देशातील सर्वात विनाशकारी गारपीट, अवकाळी पाऊस आहे. नवीन घरे मोठी झाली आहेत; वाढती अतिक्रमणे, वृक्षतोड या सारख्या गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून अशा संकटांचे प्रमाण वाढतच आहे.
जोरदार वादळांच्या तीव्र उतार-चढावांमध्ये गारपीट होते. खालून वादळात ओलावा ओढला गेल्याने, ती अखेर थंड, जास्त उंचीवर पोहोचते. उन्हाळ्याच्या मध्यातही, शक्तिशाली वादळाच्या वरच्या भागात हवा गोठणबिंदूच्या खाली असते, ज्यामुळे बर्फाचे स्फटिक तयार होतात. जेव्हा बर्फाचे स्फटिक पाण्याच्या थेंबांशी टक्कर घेते आणि एकत्रित होते जे अतिथंड असतात म्हणजेच, गोठणबिंदूच्या खाली असलेल्या हवेत अजूनही गोठलेले नसतात, तेव्हा गारपीट तयार होण्यास सुरुवात होते. सातत्याने वाढणारे तापमान देखील गारपीटला पोषक ठरत असते. एकंदरीत काय तर हे सारे मानवनिर्मिती अतिक्रमणाचे ‘फळ’ आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अनेक गावांमध्ये शनिवार, रविवारी जी गारपीट झाली ती वाढत्या वृक्षतोडीच्या परिणामाची आहे.
सातपुड्याच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली असून तेथे शेती काढण्यात आली आहे. निसर्गनिर्मित पानवठे नष्ट झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने सातपुड्याचे वाळवंट होत आहे. गेल्या काही वर्षांपासून अवकाळीचा फटका बसणे नित्याचे झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी त्यातून बळीराजाच्या हाती काही येर्इल याची खात्री नाही. ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ असा अनुभव गाठी असल्याने बळीराजाला कितपत मदत मिळते हा खरा प्रश्न आहे. अशा स्वरुपाचे संकट थोपविण्यासाठी पंचनामा हा उपया नसून प्रदूषण, वृक्षतोड थांबविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पाऊले उचलली तरच संकटातून मुक्ती मिळले.

मो. ९९६०२१०३११