ममुराबाद रोडवरील शेतातील विहिरीत आढळला प्रौढाचा मृतदेह
जळगाव : ममुराबाद रोडवरील एका शेतातील विहिरीत सुमारे ४५ ते ५० वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (११ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश चिंचोरे, प्रदीप राजपूत, सोपान पाटील आणि देवेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.