मामा सुपेकर अडचणीत : वकिलाचे खळबळजनक आरोप

धमकीमुळे अमरावती जिल्हा करागृहात भीतीचं वातावरण

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हगवणेंचे मामा तुरुंग विशेष महानिरीक्षक, जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीमधील वकिलाने त्यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. थेट कैद्याकडूनच 550 कोटींची मागणी केल्याचे म्हटले आहे. या आरोपींनी सर्वत्र खळबळ माजली आहे.

जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीमधील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप आहे. जालिंदर सुपेकर हे 2023 मध्ये अरमरावतीमध्ये तुरुंग उपमहानिरिक्षक होते. त्यावेळी त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप वकिलाने केला आहे.

नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायवाड हे अमरावती तुरुंगात होते. या प्रकरणी वकील निवृत्ती कराड यांनी 4 नोव्हेंबर 2023 ला नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. 550 कोटी रुपयांत निपटवून टाकतो अन्यथा अमरावती तुरुंगात मरा, अशी सुपेकरांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. सहकार्य न केल्यास सुपेकरांकडून 7 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याची धमकी मिळाली होती. निलंबनाच्या कारवाईमुळे अमरावती जिल्हा करागृहात अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.