मामीच्या बहिणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणाने केली मामाची निर्घृण हत्या
कौशांबी (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाने थेट आपल्या मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कौशांबी जिल्ह्यातील सिकंदरपूर बजहा गावात घडली आहे. या हत्येप्रकरणी आकाश, रोहित आणि विजय ऊर्फ छोटू भारतीय या तिघांना पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी संदीपन घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाडाखाली एक २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे नाव महेंद्र प्रजापती ऊर्फ छोटू असून तो आकाशचा मामा होता.
पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या पिकअप वाहनाच्या क्रमांकावरून मृतदेहाची ओळख पटवली. मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासल्यानंतर आकाश, रोहित आणि विजय यांच्यावर संशय बळावला. मनौरी पुलिया परिसरातून तिघांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी आकाशने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, तो मामीच्या बहिणीच्या प्रेमात होता आणि दोन वेळा तिला घेऊन पळूनही गेला होता. या प्रकारामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला होता आणि नातेवाईकांनी पंचायत बोलावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
या वेळी मामाने सर्वांसमोर आपली खोटी लाज काढली आणि अपमान केला, त्यामुळे सूडबुद्धीने आकाशने हत्या करण्याचा निर्णय घेतला.
रात्रीच्या अंधारात भयाण कट
गुरुवारी रात्री, आकाशने आपल्या चुलत भावाला आणि मित्राला घेऊन मामाची हत्या करण्याचा कट रचला. त्यांनी महेंद्रला सुनसान ठिकाणी बोलावून त्याच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर आरोपींनी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, रक्ताने माखलेले कपडे आणि घटनेच्या वेळी वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
या प्रकरणी सीओ सतेंद्र तिवारी यांनी सांगितले की, “आम्हाला घटनास्थळी एक पिकअप मिळाला होता. त्यावरून मृताची ओळख पटली. महेंद्रच्या मोबाईलमधून तपास करत असताना तीन तरुणांवर संशय आला. तिघांना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.”