मालमत्ता कर भरा, अन्यथा कोर्टाची पायरी चढावी लागणार

४,५०० थकबाकीदारांची प्रकरणे लोक अदालतसमोर; महापालिकेची कडक भूमिका

0

मालमत्ता कर भरा, अन्यथा कोर्टाची पायरी चढावी लागणार

४,५०० थकबाकीदारांची प्रकरणे लोक अदालतसमोर; महापालिकेची कडक भूमिका

जळगाव: महापालिकेने वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या ४,५०० थकबाकीदारांची प्रकरणे वादपूर्व निवारणासाठी लोक अदालतसमोर सादर करण्यात आली आहेत. येत्या २२ मार्च रोजी या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी थकबाकीदारांना नोटीस पाठवण्याचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत ३,४६३ जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित १,०३७ थकबाकीदारांना आज नोटीस दिली जाणार आहे.

कोट्यवधी रुपयांची थकबाकी, कठोर कारवाईचा इशारा
महापालिका हद्दीतील ४,५०० मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने वारंवार सूचना देऊनही अनेकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे लोक अदालतमार्फत अंतिम संधी दिली जात आहे.

कर न भरल्यास लिलावाची कारवाई
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नोटीस मिळूनही कर न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांची प्रकरणे लोक अदालतमध्ये निकाली काढली जातील. तसेच, मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल.

थकबाकीदारांनी त्वरित कर भरण्याचे आवाहन
महापालिकेने थकबाकीदारांना पुढील कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन केले आहे. अन्यथा, कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.