Friday, May 20, 2022

ग्राम तांदुळवाडीत तीन बंद घरे फोडली; दागिन्यांसह रोकड लंपास

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम तांदुळवाडीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ अंगणात किंवा गच्चीवर झोपलेले असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी गावातील तीन घरांचे दरवाजे पाठीमागून तोडून घरात घुसून कपाटातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजेदरम्यान उघडकीस आली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बोरले यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली.

- Advertisement -

तांदुळवाडी गावातील विनायक जगन्नाथ बोरले हे सह कुटुंब रात्री घरासमोरील अंगणात झोपलेले असताना त्यांच्या घराचा मागील दरवाजा, अशोक सुखदेव फेंगडे सह कुटुंब गच्चीवर झोपलेले असतांना घराचा मुख्य दरवाजा, ग.भा. सिंधुबाई बारसु झनके यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोने चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम लंपास केली.

चोरट्यांनी धुमाकूळ घालून ऐवज लंपास केला असल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद महाजन पोलीस ताफ्यासह तांदुळवाडी गावात दाखल झाले. विनायक जगन्नाथ बोरले रा. तांदुळवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे व अशोक फेंगडे, ग.भा. सिंधुबाई झनके अशा तिघांच्या घरांचे दरवाजे तोडून कपाटातील सोने चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम असा एकुण 92,000 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 457,380 भांदवि नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बिट जमादार पो.हे.काॅ विजय टेकाडे करीत आहे. एकाच दिवशी गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तिन घरे फोडून लाखांचा ऐवज लंपास केल्याने पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या