Thursday, May 26, 2022

घरात घुसून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मलकापूर ; घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी विष्णूनगर येथील राजाराम शंकर खंडारे याच्यावर  विविध कलमान्वये अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी की, शहरातील विष्णूनगर परिसरात राहणाNया   ४० वर्षीय महिलेने मलकापूर शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी २ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता माझ्या दोन्ही मुलींसह घरामध्ये असतांना माझ्या शेजारी राहणारा राजू उर्पâ राजाराम शंकर खंडारे (वय ४५) रा.सालीपुरा, विष्णूनगर पुâकटपुरा मलकापूर हा माझ्या घरात आला व मला अश्लील भाषेत बोलीत मी तुझ्या मुलाला सोडणार नाही व जिवे मारून टाकीन असे म्हटले. त्यावेळी खंडारे याने मला पकडून माझ्या इज्जतीला लज्जा पोहचेल असे कृत्य केले. तेव्हा मी घाबरून ओरडली असता माझ्या शेजारी राहणाNया दोन महिलांनी येवून त्याच्या तावडीतून माझी सुटका केली.

त्यानंतर मी या प्रकारामुळे घाबरून घराबाहेर पळत गेली व आरडाओरड केली असता परिसरातील बाया व इतर नागरीक सुध्दा बाहेर आले. तरी सुध्दा राजू खंडारे हा घरातून पळत माझ्या मागे येवून मला जातीवाचक शिविगाळ करीत तुला व तुझ्या मुलांना व नवNयाला जिवे मारून टाकीन अशी धमकी देवून सडकवर सुध्दा अश्लील बोलून माझी छेडछाड करीत विनयभंग केला.

यावरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी राजू खंडारे याचे विरूध्द गुन्हा क्र.००९८/२०२२ अन्वये कलम ४५२, ३५४ अ, ३५४ ब, ३५४, ५०६ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९, ३(१) (डब्ल्यू) (आय) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल विलास कोळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या