मलकापूर येथे वैकुंठधाम स्मशानभूमिचे सुशोभीकरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मलकापूर ; माता महाकालीनगर स्थित असलेल्या स्व.लक्ष्मण हिरू चव्हाण  वैकुंठधाम स्मशानभूमिच्या सौंदर्यीकरण व मजबुतीकरण कामाकरीता आ.राजेश एकडे यांच्या पुढाकारातून व मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांच्या प्रयत्नातून सुमारे ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने त्या कामांच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम १३ पेâबु्रवारी रोजी आयोाित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृउबासचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंद कोलते हे होते. तर सत्कारमुर्ती व कामांचे उद्घाटक म्हणून आ.राजेश एकडे हे होते. तर मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, हाजी रशिदखाँ जमादार, श्यामभाऊ राठी, अ‍ॅड.साहेबराव मोरे, भाई अशांत वानखेडे, राजेंद्र वाडेकर, मनोजभाऊ देशमुख, राजू पाटील, अनिल गांधी, सनाउल्लाखाँ जमादार, बंडूभाऊ चौधरी, प्रमोददादा अवसरमोल, अ‍ॅड.जावेद कुरेशी, डॉ.अनिल खर्चे, इंदुबाई बगाडे, सौ.रेखाताई अवसरमोल, सौ.पुजाताई राठी, प्रसाद जाधव, विरसिंह राजपूत, सुहास चवरे, रोहन देशमुख, जाकीर मेमन, अनिल जैस्वाल, डॉ.सलीम कुरेशी,

रईसखाँ जमादार यांच्यासह वैवुंâठधाम समितीचे सदस्य रमेशभाऊ उमाळकर, विनोद चौधरी, दामोधरदास लखानी, ताराचंद परयाणी, अशोक राजदेव, शरद मांडवीया, राजेश महाजन, गिरीश वाधवानी, निलेश संचेती, श्याम चव्हाण, नितीन दवंडे,सदुरामलजी आहुजा, हिरासेठ राजपाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व एक झाड देऊन आगळावेगळा सत्कार करुन सत्काराप्रसंगी दिलेली झाडे वैकुंठ धाम परीसरात लावण्यात येणार असल्याचे रावळ यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांनी वैवुंâठधाम स्मशानभूमिची दुरावस्था व त्याठिकाणी प्रेतांची होत असलेली विटंबना तर गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष न दिल्याने याचा त्रास मयत झालेल्या कुटुंबियांना सोसावा लागला. याकडे गांभिर्याने लक्ष दिले, तसेच अनेक कामे न.प.मधून न करता आपण माणुसकी म्हणून स्वखर्चातून करून घेतली

मात्र त्या स्मशानभूमिचा कायापालट व्हावा याकरीता आपण वेळोवेळी आ.राजेश एकडे यांच्याकडे पाठपुरावा केला व त्यांनी सुध्दा शासनाकडे पाठपुरावा करीत सुमारे ७५ लाख रूपयांचा निधी या वैवुंâठधाम स्मशानभूमिकरीता खेचून आणल्याने त्यांचे शहर वासियांच्या व नगर पालिकेच्या वतीने आभार मानले.

तर आ.राजेश एकडे यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, मागील काळात कोणी काय केले, कोणी काय नाही केले यामध्ये न जाता आपण दोन वर्षामध्ये आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघामध्ये सुमारे ४०० कोटींच्या आसपास विकासात्मक कामांकरीता निधी खेचून आणला. तसेच यापुढे सुध्दा नांदुरा, मलकापूर परिसरातील अनेक प्रलंबित विकासात्मक कामे तसेच जिगाव प्रकल्प यासह आदी कामांकरीता तीन वर्षामध्ये भरीव असा निधी उपलब्ध करून मलकापूर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलविण्याकरीता कटीबध्द असल्याचे सांगितले.

तर अध्यक्षीय भाषणात डॉ.अरविंद कोलते यांनी आ.राजेश एकडे, अ‍ॅड.हरीश रावळ यांच्या पुढाकारातून व प्रयत्नाने जो निधी उपलब्ध करून देण्यात आला ही बाब खरोखर शहर वासियांसाठी कौतुकास्पद असून यामधून स्मशानभूमिचा कायापालट होणार असून अनेक कामे यामध्ये समाविष्ट असून उद्घाटना सोबतच दुसNया दिवशीच या कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाराकाँ जिल्हा सरचिटणीस शिरीष डोरले यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार हरी गोसावी, गजानन ठोसर, हनुमान जगताप, समाधान सुरवाडे, संदीप सावजी, विजय वर्मा, राजेश इंगळे तसेच राकेश तलरेजा, जगदीश निहलानी, रामेश्वर गोरले, सुरेश वाढे, उमेश इटणारे, मंगेश इटणारे, महादेव लटके, किशोर गणबास, विनोद राजदेव, सुभाष तलरेजा, सोपानभाऊ शेलकर, देवेंद्रआप्पा पाटील, विलास खर्चे, विजय भगत, रमेश दिपके, गोपाल कावस्कर, गोपाळ बोराखेडे, अनिल बगाडे, सुनिल बगाडे, राजू सपकाळ, गजू देवकर, अनिल राजपूत, निनाजी घाटे, मयुर हलदोने, संजय नाफडे,

नितीन परसे, रामभाऊ श्रीवास, नारायण सुरळकर, आनंद वाघ, मंगेश वानखेडे, दिपक पठ्ठे, शालीकराम पाटील, अमोल भोंडेकर, प्रमोद सोनोने, दिलीप नेमाने, अक्षय सातव, अनिल जाधव, पवन जाधव, नितीन रायपुरे, दिपक केणे, अंकुश गावंडे, गजानन वायडे, गजानन भामंद्रे, गोलु बांगळे यांच्यासह सालीपुरा, बारादरी, दुर्गानगर, माता महाकाली नगर, संत ज्ञानेश्वर नगर, मोचीपुरा, जवाईनगर, मंगलगेट, सिंधी कॉलनी, भिमनगर, काशीपुरा यासह आदी भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.